N M Awaaz – स्मॉल मिडीयम लार्ज या ज्युस आणि फास्ट फूडचे उदघाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते

खाण्याची आवड असणारे नेहमीच नवनवीन पदार्थ कुठे मिळतील याच्या शोधात असतात. अशाच खवय्यांसाठी नवी मुंबईमध्ये एस एम एल ज्युस आणि फास्ट फूड सेंटर एक अनोखा उपक्रम राबवत आहे.नेरुळ सेक्टर ४ येथे sml या जुस सेंटर चे उद्घाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.गिरीष कदम या मराठी युवकांनी नेरुळ येथील नागरिकांसाठी एक वेगळी संकल्पेना राबविली आहे. या उद्धाटन प्रसंगी माजी आमदार संदीप नाईक यांच्या समवेत उद्योजक मोहन कदम, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनील सुतार, उद्योजक गिरीष कदम, उद्योजक संजीव कुमार, विकी पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते..यावेळी माजी आमदार संदीप नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला व गिरीश कदम यांनी कोरोनाच्या काळात या उद्योगाला सुरुवात केली या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कोरोनच्या काळातही मराठी तरुण हे नोकरीच्या शोधात न जाता व्यवसाय करत आहेत हि खूप अभिमानास्पद बाब आहे या बद्दल त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. आज गिरीश कदम यांनी एक सेंटर सुरु केले परंतु भविष्यात अजून सेंटर उभे करावे अशी इच्छा संदीप नाईक यांनी व्यक्त केली.

(Visited 53 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *