N M Awaaz – सिडकोचा अनागोंदी कारभार, घरांच्या किंमती कमी करा मनसेची मागणी- गजानन काळे

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सिडकोने जुलै २०२० मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. सिडकोने एकप्रकारे पोलिसांची दिशाभूल केली असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये सर्वसामान्यांसाठी १४५०० घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेतील अनेक घरे रद्द झाली होती. रद्द झालेली घरेच किंमत वाढवून पोलीस योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच बहुतांश घरांचे बांधकाम पूर्ण झालेले असताना पोलिसांना हि घरे पावणे दोन लाख ते तीन लाखाने महाग का विकत आहेत असा प्रश्न पोलीस बांधवांना पडला आहे.

(Visited 2 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *