N M Awaaz – फिजिओथेअरपिस्ट महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

फिजिओथेअरपिस्ट  महिला डॉक्टरांचा विनयभंग करणारा एक उच्च शिक्षित आणि आय टी कंपनी मद्ये एच.ओ.डी असलेल्या आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट एक ने सापळा रचून अटक केलेय. गेली अनेक वर्षे त्याने अनेक महिला डॉक्टरांचा विनयभंग केल्याचे कबूल केलेय. यासाठी मुंबई ,नवी मुंबई आणि पुणे येथील डॉक्टर महिलांना आरोपीने टार्गेट केले होते. ऐरीक जिमी अकलेशरिया असे या इंजिनीअर असलेल्या आरोपी चे नाव आहे. 2017 साली याच्या विरोधात मुंबई मद्ये तक्रार दाखल झाली होती परंतु हा आरोपी व्हाट्स अप कॉल च्या मद्यमातून हे कृत्य करत असल्याने त्याला पकडणे पोलिसांना कठीण होऊन बसले होते. दोन महिन्या पूर्वी तुर्भे पोलीस ठाण्यात महिला डॉक्टर चा विनयभंग केल्याची तक्रार  आली यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एक ने याबाबत तपास केला आणि या आरोपीला अटक केली. सदर आरोपी महिला डॉक्टरांना  स्वतः फोन करून मोठया रुग्णालयात डॉक्टर असल्याचे भासवून आपल्या मित्राला गुप्तांगाला फिजिओथेअरपी द्यायची आहे त्याला पाठवत आहे असे सांगून स्वतः जाऊन डॉक्टरांचा विनयभंग करत असे त्याचप्रमाणे व्हाट्सअँप वर विडिओ कॉल करून आपले गुप्तांग दाखवत असे. पोलिसांनी कलकत्ता पर्यत तपास करून शिताफीने या आरोपीला अटक केलेय. या आरोपीने अश्याप्रकारे किती महिलांचा विनयभंग केलाय याचा तपास सध्या नवी मुंबई पोलिस करत आहे..

(Visited 63 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *