N M Awaaz – आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते दत्तगुरु सोसायटीचे भूमिपूजन

नवी मुंबईत जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास होण्यासाठी २.५ एफएसआय मिळावा यासाठी आमदार गणेश नाईक यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले असता त्या प्रयत्नांना यश आले.१३६ सदनिका धारकांचा प्रश्न मार्गी लागला. दत्तगुरू सोसायटी कॉ. ओ. हाउसिंग सोसायटीच्या नेरुळ सेक्टर ५ येथील दत्तगुरू सोसायटी कॉ. ओ सोसायटीच्या नागरिकांच्या उपस्थित आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.यावेळी गणेश नाईक यांच्या समवेत माजी खासदार डॉ.संजीव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगसेवक गिरीष म्हात्रे उपस्थित होते.

(Visited 14 times, 1 visits today)

You might be interested in

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *